। नागोठणे । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी मनसे नेते अमित ठाकरे शनिवारी (दि. 9) रोहा नगरीत येणार असुन ज्येष्ठ नागरिक सभागृहामध्ये अमित ठाकरे दुपारी दोन वाजता मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजमध्ये मनसे विद्यार्थी सेनेचे युनिट स्थापन करायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी साईनाथ धुळे (मो. नं. 8407923184) व महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना रोहा तालुका अध्यक्षा दिपश्री घासे ( मो. नं. 9764043544 ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रोहा तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष व मनसे रोहा तालुका सचिव साईनाथ धुळे यांनी केले आहे.