| नेरळ | वार्ताहर |
कर्जत येथील दिवाणी न्यायालयात लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अनेक वर्षे प्रलंबित असलेले तब्बल 260 दावे निकाली काढण्यात यश आले आहे. तर शासनाच्या विविध यंत्रणा यांच्या केसेस या निकाली काढण्यात लोकअदालतमध्ये यश आले असून त्यातून त्यातून शासनाला तब्बल 33 लाख 41 हजाराचा महसूल गोळा झाला आहे.
सदरील लोकन्यायालयाचे कामकाज कर्जत तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून दिवाणी न्यायाधीश एस.आर.शिंदे यांनी पाहिले. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य कर्जत बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. अरुण नायक, अॅड. डिमेलो, अॅड. आर. बी. पाटील, अॅड. एम. जे. ओसवाल आदी प्रमुख उपस्थित होते. राष्ट्रीय लोकन्यायालयाचे कार्यक्रमासाठी कर्जत न्यायालयाचे अॅड. प्रीती तिवारी, अॅड. मनोज क्षिरसागर, अॅड. कैलास मोरे, अॅड. योगेश देशमुख, अॅड. महेश घारे, अॅड. देवांग ठक्कर, अॅड. गीतेश सावंत. अॅड. अविनाश विशे, अॅड. विशाखा सोनवणे आदी वकिलांनी सहभाग घेऊन राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी केली.
लोकन्यायालयात एकूण दिवाणी व फौजदारी आणि इतर अशी 88 प्रकरणे निकाली निघाली. त्याचवेळी तसेच एकूण वादपूर्व प्रकरणे 4116 लोक अदालतमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी 260 प्रकरणे निकाली निघाली असून अनेक वर्षे तसेच एकूण वादपूर्व प्रकरणे देखील निकाली निघाली आहेत. त्या प्रकरणाच्या माध्यमातून शासनाच्या नगरपरिषद, महावितरण, महसूल, भारत दूरसंचार, पोलीस वाहतूक अशा विभागातील प्रकाराने निकाली निघाली.