म्हसळा आयटीआयमध्ये अनेक पदे रिक्त

शैक्षणिक दर्जा खालावतोय पालकांना चिंता
| म्हसळा । वार्ताहर ।

आयटीआयमध्येविद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देतात आणि लवकरात लवकर काम मिळवणे सोप्पे होते, या उद्देशाने पालकांनी मुले शिक्षणासाठी पाठविली. परंतु म्हसळा आयटीआयमध्ये प्राचार्य, इन्स्ट्रक्टर (शिल्प निदेशक) ची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थी नक्की काय शिकतात यावर पालक नाराज आहेत. वीज तंत्री, यांत्रिक इलेक्ट्रॉनिक, जोडारी, संधाता, नळ कारागीर, शिवण व कर्तन हे ट्रेड आहेत, या सहा ट्रेंडसाठी 132 विद्यार्थाना मंजूरी असताना केवळ 96 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्राचार्य आणि इन्स्ट्रक्टर (शिल्प निर्देशक) यांचा संपर्क कमी असल्यामुळे विद्यार्थी संख्या कमी झाल्याची तक्रार आहे. कार्यालयीन व्यवस्थापनातील कनिष्ठ लिपीक 1, सहा.भांडारपाल 1, चतुर्थ श्रेणी कर्मचारी 2 अशी पदे रिक्त आहे. कार्यालयीन मंजूरपदांपैकी 64 %पदे रिक्त आहेत. तांत्रिक व कार्यालयीन कामकाजासाठी 14 पदे मंजूर असून केवळ 5 पदे कार्यरत आहेत. श्रीवर्धन टेक्निकल हायस्कूलच्या प्राचार्याकडे, म्हसळा, श्रीवर्धन आणि माणगाव आयटीआय, असे 3 प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यभार आसल्याने विज बील थकीत रहाते म्हणून म्हसळा आयटीआयचे वर्षातून 3 वेळा लाईट कट केल्याच्या घटना घडतात.

म्हसळा आय.टी.आय.मध्ये 6 ट्रेड कार्यरत असताना केवळ 2 ट्रेडना शिक्षक असणे, 132 विद्यार्थ्यांना मंजूरी असताना केवळ 96 विद्यार्थी प्रवेश घेणे हे खढख प्राचार्य आणि आस्थापनेतील उणीवा आहेत. प्राचार्याचा स्थानिक लोक प्रतिनिधी, ग्रामस्थांजवळ संवाद असता तर सर्व ट्रेड भरभरून चालतील.

रियाज फकीह, माजी सरपंच, वरवठणे

श्रीवर्धन -म्हसळा तालुक्याचा पर्यटन, व्यवसायीक आणि औद्योगिक विकास सुरु असताना ट्रेड 6 आणि केवळ 2 इन्स्ट्रक्टर (शिल्प निदेशक) हे चुकीचे आहे. भविष्यांत मोटर व्हेकल मॅकॅनिक, मरीन फिटर, डीझेल मॅकॅनिक यापैकी ट्रेड सुरु होणे आवश्यक आहे.

निलेश मांदाडकर, सरपंच ग्रामपंचायत,खरसई
Exit mobile version