‘एकदा काय झालं’, ‘गोदावरी’चा सन्मान
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये यावर्षीही मराठी सिनेमाचा डंका वाजला आहे. याबरोबरच ‘एकदा काय झालं’ आणि ‘गोदावरी’ या दोन मराठी चित्रपटांनाही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्याच बरोबर ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचंही नाव आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेत्री कृती सेनन या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या आहेत.
फिचर फिल्म कॅटेगिरीमधील पुरस्कार ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट गेल्या वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित झाला. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात काश्मीरमधील पंडितांवर झालेल्या अत्याचाराबाबत भाष्य करण्यात आलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा ओलांडला. तर आता यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये या चित्रपटाची दखल घेण्यात आली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत सामील झाला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून नर्गिस दत्त पुरस्कार जाहीर झाला आहे. तरी याचबरोबर या चित्रपटासाठी अभिनेत्री पल्लवी जोशी हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ व्यतिरिक्त या राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीमध्ये ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. तर ‘मिमी’, ‘पुष्पा’, ‘आरआरआर’, ‘सरदार उधम’ चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. याबरोबरच ‘एकदा काय झालं’ आणि ‘गोदावरी’ या दोन मराठी चित्रपटांनाही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.
रेखाला ज्युरी पुरस्कार शेखर बापू रणखांबे यांच्या रेखा या सिनेमाला सामाजिक विषयावरील माहितीपट ज्युरी ॲवॉर्ड मिळाला आहे. रणखांबे यांनी रेखाच्या माध्यमातुन मोठा आणि विषय मांडला आहे. आपण अनेकदा रस्त्याशेजारी राहणाऱ्या महिलांकडे दुर्लक्ष करतो. रस्त्यावर राहणाऱ्या महिला सुद्धा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. या महिलांच्या आयुष्यातील अडचणी मांडतानाच रेखा हा माहितीपट महिलांच्या मासिक पाळी आरोग्याच्या वाईट स्थितीकडेही लक्ष वेधतो. या विषयावर संशोधन करत असताना या महिला किती अस्वच्छ असतात आणि त्या दिवसेंदिवस अंघोळ करत नाहीत. अशी प्रतिक्रिया रणखांबे यांनी दिली आहे.
