हिरवळ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन

। माणगाव । प्रतिनिधी ।

हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ सायन्स महाडमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य सुदेश कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मंदार पिंगळे यांनी महाराष्ट्राचा इतिहास व संस्कृती मराठी भाषेत खोलवर रुजलेली आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचा वारसा आपल्या बोलण्यातून, कृतीतून आपण दाखवला पाहिजे, असे मत मांडले. प्राचार्य सुदेश कदम यांनी मराठी भाषा दिनाचे महत्त्व आणि सखोलता या विषयावर माहिती सांगितली. मराठी भाषा दिनाचे सखोल सांस्कृतिक महत्त्व आणि वारसा जतन करण्यात आणि विविध संस्कृतींमधील एकोपा वाढविण्यात मराठी भाषा किती महत्त्वाची भूमिका पार पाडते यावर विचार मांडले. मराठी भाषेतील विविध अलंकार, वृत्ते, मराठी भाषेचे सौंदर्य, आपलेपणाची भावना, सांस्कृतिक विविधता यावर मार्गदर्शन केले. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष किशोरजी धारिया यांनी मराठी भाषा गौरव दिन सोहळ्याबद्दल उत्साह व्यक्त केला आणि भाषा विविधता आणि परस्पर-सांस्कृतिक परस्परसंवादाला प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयाच्या समर्पणावर भर दिला.

Exit mobile version