सीएनजी पंपाविरुद्ध मोर्चा

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत शहराला लागून असलेल्या हालिवली गावाच्या हद्दीतील सीएनजी पंपावर मंगळवारी आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी धडक मोर्चा काढला. गेली दोन महिने हा पंप बंद असून त्यामुळे वाहनचालकांचे हाल होत असून त्याबद्दल आवाज उठवण्यासाठी आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी धडक मोर्चा काढला होता.

गेली दोन महिने बंद असलेल्या सीएनजी पंपामुळे वाहनचालक यांचे हाल होत आहेत. त्यात हा पंप असल्याने आजूबाजूला नवीन पंप मंजूर होत नाही आणि त्यामुळे वाहनचालक यांचे मोठे हाल होत असून त्यांना नेरळ किंवाचौक येथे सीएनजी गॅस भरून घेण्यासाठी जावे लागत आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत च्या वतीने पंपावर धडक मोर्चा काढला.यावेळी राहुल डाळींबकर, अरविंद मोरे, दीपक गायकवाड, राहुल गायकवाड, संतोष जाधव.सुमित सुर्वे.तसेच रिक्षा चालक मालक संघटनेचे पद अधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version