मार्गारेट अल्वा यूपीएच्या उमेदवार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
संयुक्त पुरोगामी आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी आज उमेदावारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखड यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तर युपीएकडून काँग्रेसनेत्या मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत अल्वा यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसनेते मल्लिकार्जून खरगे उपस्थित होते. शरद पवार म्हणाले की, विरोधी आघाडीतील पक्षांसोबत यांच्यासोबत चर्चा करून माजी केंद्रीयमंत्री, माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचं नाव उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निश्‍चित केलं आहे.
मार्गारेट अल्वा यांना विरोधी गटातील 17 पक्षांचा पाठिंबा असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जुलै असून मतदान 6 ऑगस्टला होणार आहे.

राष्ट्रपती पदासाठी भाजपने आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रपतीपदासाठी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आङे. राष्ट्रपतीपदासाठी उद्या मतदान होणार आहे.

Exit mobile version