मरीआई प्रासादिक सेवा भजन स्पर्धा

बाप्पा देव मंडळ विजेता

। भाकरवड । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील भाकरवड येथे मरीआई प्रासादिक सेवा भजन मंडळाच्या माध्यमातून रविवारी (दि.7) भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बाप्पादेव प्रसादिक भजन मंडळ अंतिम विजेता ठरला आहे.

या स्पर्धेत सागरगड पंचक्रोशितील ग्रामीण भागातील एकूण 15 भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने दत्त प्रासादिक भजन मंडळ चोले, शिव सुरताल भजन मंडळ मेढेखार, मरीआई महिला भजन मंडळ तलासेत, श्री हनुमान संगीत भजन मंडळ देहेन, नवनाथ भजन मंडळ धाकटे शहापूर, श्री बाप्पादेव प्रासादिक भजन मंडळ दीवलांग, जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ धेरंड, श्री विठल प्रासादिक भजन मंडळ लेभी, जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ चॉकीचापाडा, श्री कृष्ण भजन मंडळ कोंघर आवेठी, मरीआई प्रासादिक भजन मंडळ धाकटे शहापूर यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमात उत्कृष्ट पखवाज व बासरी वादक सचिन धुमाळ यांचा जुगलबंदी कार्यक्रमाने उपस्थित सर्वांची मने जिंकली. त्यामध्ये पखवाज साथ प्रतीक नाईक व मृदुंग निमिष जूईकर यांनी दिली.

या भजन स्पर्धेत या सर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला श्री बाप्पादेव प्रासादिक भजन मंडळ, द्वितीय क्रमांक श्री कृष्ण भजन मंडळ तर तृतीय क्रमांक नवनाथ भजन मंडळ यांना सचिन भाऊ साळुंखे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान चिन्ह व अनुक्रमे दहा, सात व पाच हजार रुपये बक्षिस देण्यात आले.

तसेच, उत्कृष्ट पखवाज वादक शिव सुरताल भजन मंडळ, उत्कृष्ट गायक बाप्पादेव प्रासादिक भजन मंडळ, उत्कृष्ट चकवा नवनाथ भजन मंडळ तर, श्री विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ आणि श्री हनुमान संगीत भजन मंडळ यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. या भजन स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व सभासदांना मंडळाच्यावतीने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version