धोकवडे कबड्डी स्पर्धेत मरीदेवी धेरंड संघ विजयी

| सोगांव | वार्ताहर |
जुईली नितेश कडू फाऊंडेशन व ग्रामस्थ मंडळ धोकवडे आयोजित जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत मरीदेवी धेरंड संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक शिवाई बांधण संघाने पटकावला, तसेच तृतीय क्रमांक गणेश स्पोर्ट्स क्लब उरण संघाने पटकावला आणि चतुर्थ क्रमांक कार वेश्‍वी संघाने पटकावला.

स्पर्धेचे उद्घाटन अमिर ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी शंकर गुरव, संदीप पालकर,स्नेहल देवळेकर,दर्शना वाकडे,राजाभाऊ ठाकूर,धोकवडे व सासवणे ग्रामपंचायत सदस्य व सदस्या, एकविरा क्रीडा मंडळ धोकवडे सर्व सदस्य, गावदेवी क्रीडा मंडळ धोकवडे सर्व सदस्य, दिलीप कडू व कडू परिवार धोकवडे, ग्रामस्थ मंडळ धोकवडे व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी सर्वोत्कृष्ट खेळाडू-ऋतिक पाटील (धेरंड), ऊत्कृष्ट चढ़ाई-अनुराग शिंग (वेश्‍वी), उत्कृष्ट पकड-मयुर कदम (उरण), पब्लिक हिरो-राज जंगम (बाधंण) यांना मान देत गौरविण्यात आले. बक्षीस वितरण रमेश बाळू म्हात्रे व रामचंद्र म्हात्रे यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी एकविरा क्रीडा मंडळ धोकवडे सदस्य, गावदेवी क्रीडा मंडळ सर्व सदस्य, ग्रामस्थ मंडळ धोकवडे व मांडवा जेट्टी मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत व मोठ्या उत्साहात करण्यात आले.

Exit mobile version