| खारेपाट | वार्ताहर |
आवास येथे कृषक महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेत मरीदेवी धेरंड संघ विजेता ठरला. तर उपविजेता शिवाई बांधण संघ व तृतीय क्र. गणेश क्लब उरण व चतुर्थ क्र. रोहा संघ हे संघ विजेते ठरले.
स्पर्धेत उत्कृष्ट पकड बाजी पाटील, उत्कृष्ट चढाई सौरभ राऊत, सर्वोत्कृष्ट खेळाडू ऋत्विक पाटील अशा सर्व स्पर्धेत उत्कृष्ट खेळी करणार्या संघाला व खेळाडूंना पारितोषिके व ट्रॉफी देऊन सरपंच अभिजीत राणे व ज्येष्ठ खेळाडू रणजीत राणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. व अन्य मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
सदर स्पर्धेचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. यावेळी सर्व खेळाडूंना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी अॅड. आस्वाद पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वागताध्यक्ष आवास सरपंच अभिजीत राणे, बाणा हायस्कूलचे मुख्याध्यापक भगत सर, रायगड जिल्हा शिवसेना पदाधिकारी सुरेंद्र म्हात्रे, तसेच सर्वपक्षीय नेते मंडळी आवर्जून उपस्थित होती. तसेच मेळाव्यास द्वारकानाथ नाईक, संदेश वर्तक, दिल खुश आवास क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व खेळाडू मोलाचे सहकार्य केले.
सदर स्व. प्रभाकर राणे यांच्या स्मरणार्थ भरविण्यात आल्या होत्या.स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने क्रिडा रसीक व महिला वर्ग उपस्थित होता. मंडळाच्या वतीने सरपंच अभिजीत राणे यांनी स्पर्धेचे राष्ट्रीय खेळाडू व पंच कमिटीचा व मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत नामवंत 16 संघाचा समावेश करण्यात आला होता.