| नवीन पनवेल | प्रतिनिधी।
खांदेश्वर पोलिसांनी 50 हजार रुपयांचा गांजा जप्त करत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.10) रात्री एचडीएफसी सर्कल जवळ एक व्यक्ती गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खांदेश्वर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एचडीएफसी सर्कल पासून पनवेलकडे जाणाऱ्या पुलाखाली वैभव जावजी रिंगे याच्याकडून 501 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला.
पन्नास हजार रुपयांचा गांजा जप्त
