सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन डिझेल इंजिन देखभाल प्रशिक्षण

| अलिबाग । वार्ताहर ।
मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणार्‍या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, डिझेल इंजिन देखभाल व परिचालन या प्रशिक्षणाच्या दि.01 जानेवारी 2023 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र रायगड-अलिबाग येथे सुरु होणार्‍या प्रशिक्षण सत्रासाठी जिल्ह्यातील युवकांकडून दि.31 डिसेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.

या प्रशिक्षणांतर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद्राच्या 57 फूट लांबी असलेल्या 63.35 टनेज क्षमतेच्या सिलेंडर संख्या 6 व 205 अश्‍वशक्तीचे इंजिन असलेल्या मत्स्यप्रबोधिनी नोंदणी क्र. खछऊ-चक-3-चच्-4266 या प्रशिक्षण नौकेद्वारे सागरी सफरीवर नेऊन प्रात्यक्षिक व सिध्दांतिक ज्ञान दिले जाणार आहे.
प्रशिक्षण कालावधी दि.01 जानेवारी ते दि.30 जून 2023 असणार आहे. उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे, उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक, प्रशिक्षण शुल्क- प्रतिमहा रुपये 450 प्रमाणे सहा महिन्यांचे रु.2 हजार 700 मात्र, दारिद्रय रेषेखालील असल्यास प्रतिमहा रुपये 100 प्रमाणे सहा महिन्यांचे रुपये 600 मात्र राहिल.

इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी थेट किंवा मोबाईल व व्हॉट्सअप क्र. 9860254943 वर संपर्क साधल्यास विहित नमुन्यातील अर्ज मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रायगड अलिबाग, 102/103, समृध्दी को-ऑप. हौसिंग सोसायटी, घरत आळी, एस.टी.स्टँडजवळ,रायगड अलिबाग, ता.अलिबाग या पत्त्यावर षीेंरश्रळलरसीशवळषषारळश्र.लेा या ई-मेलवर सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी सु.श.बाबुलगावे यांनी केले आहे.

Exit mobile version