डिझायनर राख्यांना मागणी राख्यांचे ट्रेंड बदलले
पाताळगंगा | काशिनाथ जाधव |
बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण एक आठवड्यावर येऊन ठेपल्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत निरनिराळ्या रंगीबेरंगी राख्यांनी दुकाने सजली आहेत. मुलींसह महिलावर्ग बाजारपेठेत राख्या खरेदी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.
गेल्या वर्षापासून आलेला कोरोनासारख्या या विषाणू सध्या चढता-उतरता आलेख करीत असल्यामुळे सातत्याने कोरोनाची भीती यामुळे आपण सुरक्षित राहून आपल्याला हव्या त्या वस्तू खरेदी करत आहेत. यामुळे एका आठवड्यावर आलेला रक्षाबंधन हा सण साजरा करण्यासाठी महिलावर्ग बाजारपेठत राखी खरेदी करीत असल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे.
दरवर्षाप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या दहा दिवस अगोदर बाजारात राख्या विक्रीला आल्या आहेत. तसेच बाजारपेठत यंदा वेगवेगळ्या रंगांच्या व आकारांच्या राख्या आल्या आहेत.कार्टुन कॅरॅक्टर्सच्या राख्या छोट्या दोस्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. महिला चांदीचे लेपन केलेल्या, मेटलच्या, कृत्रिम हिरे लावलेल्या, रुद्राक्ष, स्वस्तिक, ओम अशी धार्मिक चिन्हे असलेल्या राख्यांना पसंती देत आहेत. सर्वांनाच इतरांपेक्षा वेगळी राखी हवी आहे, अशी माहिती राखी विक्रेते यांनी दिली. भारतीय राख्यांच्या तुलनेत त्यांचे भावसुद्धा खिशाला परवडतील असेच असल्याने देशी उत्पादनांना त्यांच्याशी स्पर्धा करावी लागत आहे. दूरवरच्या भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी पूर्वी ताई-माईंची पोस्टात मोठी गर्दी पाहायला मिळायची. आता ती जागा कुरिअर कंपन्यांनी घेतलेली आहे. परंतु, यंदा बाजारात राख्यांचे विविध प्रकार आले असल्यामुळे त्यांची मागणी तेवढीच वाढली आहे.
या सणाची उत्सुकता आम्हा महिलांना लागली आहे. बहीण-भावाच्या अतूट प्रेमाची साक्ष देणारा सण म्हणजे रक्षाबंधन, या उद्देशाने मी राखी खरेदी केली आहे.
अरुणा ठोंबरे, कलोते, गृहिणी