दिवाळीनिमित्त बाजारपेठा फुलल्या

| राजेश डांगळे |

प्रत्येक सणाचा तसा खास वेगहा रंग चढतो आणि हा रंग सगळ्यात आधी परावर्तित होतो तो बाजारपेठांमध्ये. दिवाळीला जेमतेम एक आठवडा उरला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या असून, गर्दीने ओसंडून वाहू लागल्या आहेत. पायपुसण्यापासून पडद्यापर्यंत आणि पणतीपासून झुंबरापर्यंत खरेदीसाठी ग्राहम दुपारच्या वेळीही बाजारात उपस्थिती लावत आहेत. रांगोळी, सुकामेवा, विविध तोरणांनी, माळांनी झळाळी चढली आहे.

अवघ्या शंभर रुपयांपासून चारशे-पाचशे रुपयांपर्यंत विविध प्रकारचे कंदील उपलब्ध आहेत. पारंपरिक कंदिलांसोबतच बांबू, वेतापासून बनवलेले कंदीलही लक्ष वेधून घेत आहेत. रंगीबेरंगी पणत्यांपासून मातीच्या पणत्यांची भुरळ ग्राहकांना पडत आहे. मोती, जर, मणी यांनी सजलेल्या पणत्या लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळीमध्ये मिठायांबरोबरच सुका मेव्याचीही देवाणघेवाण होते. सुकामेव्याचे रेडिमेड बॉक्स खरेदीसाठी ग्राहकांची पावले वळू लागली आहेत.

Exit mobile version