दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारात तेजीचे वातावरण

सोने, चांदीच्या दागिन्यांसह दुचाकी, चारचाकी खरेदीची लुट

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

दसऱ्यानिमित्त रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या वस्तू खरेदीचा उत्साह दिसून आला. गुरुवारी (दि.2) सकाळपासून वाहन, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासह सराफ बाजारात जोरदार खरेदी-विक्री झाली. जीएसटी कमी झाल्याने विशेषत: वाहनांची मागणी वाढली. एका दिवसामध्ये चारशेहून अधिक दुचाकी, आणि शंभरहून अधिक चार चाकी खरेदी झाल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेने यंदा दुचाकी खरेदीत 20 टक्केने वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सोन्याच्या किंमती वाढल्या असल्या तरी देखील सोने खरेदीचा उत्साह कायमच असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण दिसून आले.

नवरात्रौत्सवानंतर दसऱ्या मुहूर्तावर सोने, जागा, घर, वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे या कालावधीत घरगुतीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मोठ्या वस्तू खरेदी करण्यावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर वेगवेगळ्या लहान मोठ्या वस्तू आपल्या ऐपतीप्रमाणे खरेदी केल्या जातात. यंदा दसऱ्यानिमित्त गुरुवारी (दि.02) सकाळपासून वेगवेगळ्या शोरुमध्ये वाहन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. वाहन खरेदी केल्यावर त्यांना हार घालून, पुजा करून ग्राहकांनी ते घरी नेले. खरेदी केलेल्या वाहनांसमवेत अनेकांनी सेल्फी व फोटो काढून सोशल मिडीयावर ते व्हायरल देखील केले. दसऱ्याला नवीन वाहन दारात यावे, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बुकिंगला गर्दी होती. दसऱ्याच्या मुहूर्तावरही मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले. यामुळे सर्वच वाहनांच्या शोरुम्समध्ये गर्दी होती.

रायगड जिल्ह्यामध्ये यंदा होंडा, हिरो शोरुमधून दुचाकी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्या. पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकीला ग्राहकांनी अधिक पसंती दर्शविली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यावर्षी जीएसटीचे दर कमी झाल्याने वाहनांच्या किंमतीतही घट झाली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेने दुचाकी खरेदीत यावर्षी 20 टक्केने वाढ झाली आहे. 400हून अधिक दुचाकी खरेदी झाल्याचे दुचाकी विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनेदखील खरेदीवर ग्राहकांनी कल दिला असल्याचे पहावयास मिळाले. यंदा मात्र 80हून अधिक चारचाकी वाहने खरेदी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सुझुकी कंपनीची 50 हून अधिक वाहने खरेदी झाली आहेत. यावर्षी ग्राहकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही, असे दुचाकी विक्रेते त्यागी यांनी सांगितले.

दसऱ्या निमित्त वेगवेगळी सवलत देण्यात आली. 60 टक्के रोखीत आणि 40 टक्के ग्राहकांनी फायनान्सद्वारे वाहने खरेदी केली. जीएसटी दर कमी झाल्याने ग्राहकांनी दुचाकी खरेदीवर अधिक भर दिला आहे. यंदा दुचाकी वाहने खरेदीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 250 हून अधिक होन्डा कंपनीची वाहने खरेदी झाल्या आहेत. त्यामध्ये स्कूटर या वाहनांना अधिक पसंती ग्राहकांनी दर्शविली आहे.

नवीन झा
व्यवस्थापक हिरो शोरुम

Exit mobile version