। पनवेल । प्रतिनिधी ।
खालापूर येथे राहणाऱ्या एका 19वर्षीय तरुणाने 16वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिला गरोदर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समीर पवार असे या तरुणाचे नाव असून, पनवेल तालुका पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जुलै 2025च्या दरम्यान समीर याने पीडित मुलीला राहत्या घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते, त्यानंतर त्याने तिच्यासोबत लग्न केले. दरम्यान, पीडित मुलगी गरोदर राहिली. 27मार्च 2026रोजी पीडित मुलीला प्रसूती कळा येऊ लागल्याने तिला अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टर शस्त्रक्रिया करून तिची प्रसूती करताना ती अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी त्वरित ही माहिती अलिबाग पोलिसांना दिली. त्यानंतर या अत्याचाराचा उलगडा झाला.






