रसायनी येथे विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा दाखल

। रसायनी। प्रतिनिधी।

रसायनी येथे विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रसायनी पोलीस ठाणे हद्दीत 16 डिसेंबर 2023 ते 7 फेब्रुवारी 2026 दरम्यान घडली आहे. मुख्य आरोपी पती याने पीडित महिलेला पत्नीचा दर्जा न देता ‘मै तुम्हारा खानदान बरबाद कर दूंगा, खत्म कर दूंगा’ अशी वारंवार धमकी देऊन पीडित महिलेचा मानसिक व शारीरिक छळ करून घरातून हाकलून दिले. तसेच सासू व सासरे आरोपी यांनी शिवीगाळ व मारहाण करून घरातून हाकलून दिले. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version