शहीद भगतसिंग स्मृतीदिनी कविसंमेलन

कर्जत । वार्ताहर ।
कर्जत कोकण मराठी साहित्य परिषदेने वेणगाव या गावी शहीद भगतसिंग स्मृतीदिनी जिल्हास्तरीय दिमाखदार कविसंमेलन आयोजित केले गेले. या संमेलनाचे उद्घाटन कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रायगडभूषण प्रा.एल.बी. होते.
याप्रसंगी अ‍ॅड.गोपाळ शेळके यांच्या सुप्रसिद्ध बंडखोर कुणब्याचं पोर या कादंबरीच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन सुधीर शेठ यांच्या अभ्यंगे, पत्रकार गणेश कोळी, जयपाल पाटील, अवि.जंगम मच्छिंद्र म्हात्रे, उज्ज्वला दिघे, जयवंत पाटील, प्रकाश राजोपाध्य आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. राजेंद्र राठोड, ग्यानदेव वाडिले यांनी सूत्रसंचालन केले.
कविसंमेलनाची सुरुवात नगराध्यक्षा यांच्या कविता वाचनाने झाली. नरेंद्र हर्डीकर, गंगाधर साळवी, प्रा.मनिषा बैकर, मंदाकिनी हांडे, भरत पाटील, संदीप बागडे, महेश बार्शी, पी.का.सोनावणे, प्रा.सरोदे, स्मिता गांधी, मारुती बागडे भारती ढाकवळ, सतिश शेळके इत्यादी 63 कवींनी कवितांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक अड गोपाळ शेळके आणि आभार लक्ष्मण अभ्यंगे यांनी मानले.

Exit mobile version