। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
मारुती सुझुकी इंडिया आपल्या विविध मॉडेल्सच्या किंमतीत सप्टेबर 2021 पासून वाढ करणार आहे. याची घोषणा त्यांनी आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये केली होती. पण, या किंमती कशा प्रमाणात वाढणार आहेत याबाबतची माहिती मात्र कंपनीने अजून उघड केलेली नाही. मारुती सुझुकी ने या किंमतीत वाढ करण्याचे कारण उत्पादन प्रक्रियेच्या खर्चात झालेली वाढ असल्याचे सांगितले. ही किंमतवाढ आर्थिक वर्ष 2021 – 22 च्या दुसर्या तिमाहीत होणार असल्याचे सांगितले होते.