वृद्धांना मास्क, फळांचे वाटप

कर्जत | वार्ताहर |
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे नेते सुनील गोगटे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि भारतीय जनता पार्टी युवा कर्जत शहराच्या वतीने हॅपी फ्लॉक ओल्डेज होम येथे वृद्धांना मास्क आणि फळ वाटप करण्यात आली.

याप्रसंगी त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद बघण्यासारखा होता. कुणीतरी आपली माणसे आल्यासारखी वाटली. सुनील गोगटे यांचा वाढदिवस त्यांनी साजरा केला. त्यांचे आशीर्वाद आम्हाला अधिक काम करण्याची उमेद देतील, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, शहर अध्यक्ष मयूर शितोळे, सर्वेश गोगटे, प्रणव पाटील, ऋत्विक आपटे, सुजल गायकवाड, अभिषेक तिवारी उपस्थित होते.

Exit mobile version