| अलिबाग | प्रतिनिधी |
ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या पूर्व मुख्य प्रशासिका दादी प्रकाशमणिजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि विश्व बंधुत्व दिनाचे औचित्य साधून ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्र, अलिबाग आणि लायन्स क्लब अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.25) महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लायन्स क्लब हॉल, ब्राह्मण आळी, नाईकवाडी, अलिबाग येथे हे शिबिर होणार आहे. रक्तदात्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असून, या महारक्तदानाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9604776684 या क्रमांकावर संपर्क साधावा.
अलिबागमध्ये उद्या महारक्तदान शिबिर
