। खोपोली । प्रतिनिधी ।
हाळ गावच्या हद्दीतील भंगार साहित्याच्या दुकानाला सोमवारी (दि.16) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दुकानात प्लास्टिक आणि कलरचे ड्रमला आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटनास्थळी खोपोली नगरपरिषदेची अग्निशमन दलाचे जवानानी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आग भीषणअसल्याने, एचओसी कंपनीच्या फायर गाड्या बोलविण्यात आल्यानंतर काही तासांनी आग विझविण्यात यश आले असले तरी, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मुंबई- पुणे जुन्या मार्गाच्या बाजूला अनेक भंगाराची गोदामे आहेत. हाळ गावाजवळ याक पब्लिक स्कूलच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली. खोपोली नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानानी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. घटनास्थळी खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण, विक्रम साबळे, मोतीराम ठोंबरे यांनी अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेऊन फायर ब्रिगेडचे वाहने बोलविली. या आगीत भंगारच्या दुकानातील प्रचंड नुकसान झाले असले तरी जिवीतहानी झाली नसल्याचे समजते.
भंगारच्या दुकानाला भीषण आग
