म्हसळा दिघी नाक्यावर भीषण आग

| म्हसळा | प्रतिनिधी |

म्हसळा दिघी नाक्यावरील पोलीस चौकीच्या मागील बाजूस पाटबंधारे विभाग कार्यालयाच्या आवारात शनिवारी (दि.23) सकाळच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने आगीचे डोंब भडकले नाही. वेळीच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड आणि विद्यमान नगरसेवक संजय कर्णिक यांनी अग्निशमन दलाला पाचारण करून आग त्वरित विझविण्यात यश मिळविले. आगीचे नक्की कारण जरी समजले नसले तरी पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात घाण आणि प्रचंड अडगल साचलेली आहे. त्याचप्रमाणे या आवारातील गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेल्या बांधकाम विभागाच्या इमारतीच्या पायऱ्यांवर दिवसभर सिगारेट वगैरे ओढण्याचे प्रकार सुरु असतात. जळते सिगारेट टाकल्यानेच ही आग लागल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आग आटोक्यात आल्यानंतर त्वरित नगरसेवक संजय कर्णिक आणि मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांनी या कार्यालयाच्या आवाराची स्वच्छता नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगारांकडून करून घेतली. आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही मदत केली.

Exit mobile version