चेंबूरमधील मंदिरात भीषण आग

| मुंबई | वृत्तसंस्था |

चेंबूर कॉलनी परिसरातील संतोषी माता मंदिरात भीषण आग लागली. ही आगीची घटना शनिवारी (दि. 19) दुपारी 2.15 च्या सुमारास घडली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या.

हे मंदिर चेंबूर कॉलनी परिसरातील असून शनिवारी (दि. 19) दुपारी 2.15 च्या सुमारास मंदिरात अचानक आग लागली. आग लागताच मंदिरातील उपस्थित भाविकांनी मंदिराबाहेर धाव घेतली. तसेच आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवान प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे समजू शकलेले नाही.

Exit mobile version