। कोलाड । वार्ताहर ।
दिवाळीच्या आगमनापूर्वी खासगी प्रवासी बस चालकांकडून पुन्हा तिकिट दरांमध्ये वाढ करत प्रवाशांची लूट चालू झाली आहे. सुट्ट्या आणि सण यांच्या काळात प्रवासासाठी अधिक तिकिट दराचा भुर्दंड भरावा लागणारच, अशी धारणा सर्वसामान्यांची झाली आहे.
2018 मध्ये राज्य शासनाने आदेश काढला आणि प्रवासी बसचे तिकिटदर निश्चित केले. परंतु, 6 वर्षे होऊन गेली तरी परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आदेशात अधिक तिकीटदर आकारणार्या खासगी बस चालकांच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी (022) 62426666 आणि 1800220110 हे दोन संपर्क क्रमांक दिले होते. ते सध्या बंद स्थितीत आहेत. ते बंद का आहेत, हे म्हणजे प्रवाशांना ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ दिल्यासारखे आहे. ही प्रवाशांची लूट केव्हा थांबणार, असा सवाल हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी केला आहे.