उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांना मातृशोक

। चिपळूण । वार्ताहर ।
येथील ज्येष्ठ व्यापारी कोयनामाई हरिचंद्र शिंदे यांचे (89) वृद्धाप्यकाळाने निधन झाले आहे. त्यांच्यावर रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चिपळूण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तसेच ज्येष्ठ भाजी व्यापारी सुधीर शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच सुधीर शिंदे यांचे चिरंजीव डॉ. हर्षल शिंदे यांचे निधन झाले आणि लागोपाठ त्यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने शिंदे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कोयनामाई यांच्या पश्‍चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Exit mobile version