| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील तळाशेत इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सेवा दलाचे अध्यक्ष दत्तात्रय जगन्नाथ पाटील यांच्या मातोश्री कै.शांताबाई जगन्नाथ पाटील यांचे शुक्रवार दि.30 जुलै 2021 रोजी राहत्या घरी तळाशेत इंदापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 96 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. कै.शांताबाई पाटील या शांत व मनमिळाऊ स्वभावाच्या व्यक्तिमत्व होत्या.तळाशेत इंदापूर याठिकाणी त्यांनी गेली अनेकवर्षे सुकी मासळी विक्रीचा व्यवसाय केला.