| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आगरी सामाजिक संस्था अलिबागचे अध्यक्ष, तसेच सह्याद्री साहित्य मंडळाचे अध्यक्ष, साहित्यिक कैलास पिंगळे यांच्या मातोश्री, सरस्वती महिला भजन मंडळ कुर्डूसच्या खजिनदार सुमित्राबाई मारुती पिंगळे यांचे शुक्रवार, २१ जानेवारी रोजी कुर्डुसमधील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळात ८५ व्या वर्षी निधन झाले.
कुर्डुस हायस्कूलचे माजी चेअरमन, कुर्डूस ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, दिवंगत मारुती धर्मा पिंगळे यांच्या पत्नी सुमित्राबाई पिंगळे या मनमिळावू स्वभाव, मेहनतीवृत्ती व भजनाची आवड असल्यामुळे परिसरात लोकप्रिय होत्या. त्यांना कैलास, संजय व सुनील असे तीन पुत्र आहेत. सुना, नातसुना, नातवंडे, पतवंडे यांनी सुमित्राबाईंचे घर भरलेले आहे. रविवार, ३० जानेवारी रोजी दशक्रिया विधी उद्धर इथे होईल, तर उत्तर कार्य बुधवार, २ फेब्रुवारी रोजी कुर्डूस येथे होईल.
