माथेरान नागरी पतसंस्था हायटेक करणार

शिवराष्ट्र पॅनलचा संकल्प
| कर्जत | प्रतिनिधी |

माथेरान नागरी पतसंस्थेच्या तोट्यातून नफ्यात आणणारे पतसंस्थेचे माजी अध्यक्ष अजय सावंत यांनी आगामी काळात माथेरान नागरी पतसंस्था हायटेक करण्याचे वचन निवडणूक जाहीरनाम्यात जाहीर केले आहे. शिवराष्ट्र पॅनल माथेरान नागरी पतसंस्थेच्या 13 संचालक यांच्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी निवडणूक होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व 13 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

शिवराष्ट्र पॅनलने माथेरान नागरी पतसंस्था सार्वत्रिक निवडणुकीसाठी पतसंस्थेचे ठेवीदार यांच्यासाठी अनेक आश्‍वासने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत. त्यात माथेरानच्या पर्यटकांसाठी गैरसोय होऊ नये म्हणून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे किंवा अन्य बँकेचे एटीएम संस्थेच्या आवारात सुरू करणे. सोने तारण कर्ज योजना पुर्नजीवित करने, भागधारकांसाठी होम लोन सुविधा उपलब्ध करणे, ठेवीदारांच्या ठेवीला संरक्षणाकरिता विमा योजना लागू करणे. संस्थेचे वसूल भागभांडवल मर्यादा 5 कोटी पर्यन्त वाढविणे. माथेरान मधील तरुण वर्ग, महिला व तळागाळातील प्रत्येक माणसाला संस्थेच्या प्रवाहात आणणे. संस्थेच्या प्रत्येक नियमित कर्जव्यवहार करणार्‍या भाग धारक सभासदांसाठी कर्ज मर्यादा पाच लाख करणे, सभासदांच्या मुलांकरिता शैक्षणिक कर्ज योजना प्रभावीपणे राबविणे. प्रत्येक भागधारकाचे व्यवहाराचे अपडेट त्यांच्या मोबाईलवर मेसेज स्वरूपात देणेची सुविधा उपलब्ध करणे.संस्थेच्या संचालक मंडळातील सदस्यांची त्रिसदस्यीय समिती नेमून त्यांच्या अधिकारात संस्थेच्या सभासदांना वैद्यकीय, शैक्षणिक व व्यवसायाकरिता अडचणीच्या काळात आजच कर्जफ योजना योजना राबविणे अशी आश्‍वासने दिली आहेत.

या माथेरान नागरी सोसायटी मध्ये 1350 भागधारक आणि गुंतवणूकदार असे मतदार असून मतदान कम्युनिटी सेंटर मध्ये होणार आहे. त्यासाठि दोन मतदान केंद्रे बनविण्यात आली असून सात ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार असून त्याच ठिकाणी सायंकाळीं पाच वाजता मतमोजणी होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शाम कपोते यांनी दिली आहे.

Exit mobile version