| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान पर्यटकांची लाडकी नेरळ- माथेरान- नेरळ मिनीट्रेन दरवर्षी पावसाळी सुट्टीनंतर 15 ऑक्टोबर रोजी सुरु होते. मात्र, माथेरान मिनीट्रेनच्या मार्गावर दोन ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्याने. यावर्षी माथेरान-नेरळ मिनीट्रेन नेहमीच्या वेळी 15 ऑक्टोबर रोजी सुरु होण्याची शक्यता मावळली आहे.
नेरळ- माथेरान या ब्रिटिश काळात सुरु झालेल्या मिनीट्रेनची वाहतूक यावर्षी 25 मे रोजी थांबवण्यात आली होती. दरवर्षी मिनीट्रेन 15 जून ते 15 ऑक्टोबर या कालावधीत बंद असते. मात्र, माथेरान घाटात यावर्षी सर्वाधिक पाऊस झाला असून, पाच हजार मिलीच्या पुढे पावसाची नोंद माथेरान मध्ये झाली आहे. त्यात पॅनोरमा पॉईंटच्या भागात गणेश उत्सवाच्या आधी मोठा भाग कोसळला आणि त्यात मिनीट्रेनच्या मार्गाचे मोठे नुकसान झाले होते. त्या दिवसापासून मिनीट्रेनची नेरळ- माथेरान- नेरळ अशी दर शनिवारी पाठवली जाणारी रिकामी मिनीट्रेन बंद आहे. त्या भागातील नॅरोगेज मार्गाची दुरुस्तीचे काम सुरु असताना आता या मार्गावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे करावी लागणार असून, या मार्गावरील दुरुस्तीची कामे रेल्वे प्रशासनाला करावी लागत आहेत. त्यामुळे यावर्षी 15 ऑक्टोबर रोजी नेरळ- माथेरान- नेरळ मिनीट्रेन वेळेवर सुरु होण्याची शक्यता नाही.
माथेरान मध्ये सोमवार पासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामध्ये माथेरान वाटर फॉल याच्या डाव्या बाजूला मिनी ट्रेनची ट्रॅक आहे. त्यांच्या ट्रॅकवर रात्रीच्या दरम्यान मोठी दरड कोसळली आहे. दुर्घटना रात्रीच्या सुमारास झाल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लँडलाईड झाल्यामुळे यामध्ये मोठ मोठाले दगड तसेच झाडे रेल्वे ट्रॅक या सोबत आलेले आहेत. माथेरान मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने विविध ठिकाणी भूस्खलन आपल्याला पाहायला मिळेल मिळत आहेत. मात्र, यावर्षी सर्व सण लवकर आल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू होते याकडे रेल्वे प्रशासन तातडीने पाऊले उचलताना दिसत आहे. नेरळ- माथेरान मार्गावर माथेरान ते अमान लॉज अशी शटल सेवा सुरु आहे.
शटल सेवेचे वेळापत्रक
माथेरान येथून अमन लॉज करिता
08.20, 09.10,11.35, 02.00, 03.15, 05.20
शनिवार रविवार
0.05,01.10
अमन लॉज स्थानकातून माथेरान करिता
08.45, 09.35,12.00, 02.45, 03.40, 05.45
शनिवार रविवार
10.30, 01.35
