। नेरळ । वार्ताहर ।
माथेरान स्वच्छ सर्वेक्षण 2022 साठी माथेरान नगरपालिकेने आतापासूनच कंबर कसली आहे.अधिकारी स्वतः प्रत्येक विभागात जाऊन स्वच्छतेविषयी पाहणी करून वेगवेगळ्या युक्त्या करीत आहे. मागील वर्षी क्रमांक न आल्याने येणार्या सर्वेक्षणात चांगली कामगिरी करून माथेरानचे नाव उंचावण्याचे आवाहन पालिकेच्या प्रशासनावर आहे. त्यासाठी जुन्या झाडांचा सर्व्हे, रंगरंगोटी,जागोजागी स्वच्छता याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2022 आणि माझी वसुंधरा अभियान भूमी या घटकांतर्गत शहरातील हेरिटेज ट्री म्हणजे 100 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वर्षे जुनी असलेल्या मिळविले जाते. झाडांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि यावर देखरेख स्वतः मुख्याधिकारी आणि प्रशासक करत आहेत.2021 च्या स्वच्छ सर्वेक्षणात माथेरान शहराची पिछेहाट झाली होती. यावेळी चांगले यश मिळविण्यासाठी माथेरान गिरीस्थान नगरपरिषद कडून जोरदार तयारी सुरू आहे. प्रत्येक विभागात फिरून स्वच्छतेची पाहणी करून स्वच्छता अधिकार्याकडून दररोज आढावा घेत आहेत. अनेक ठिकाणी खराब झालेल्या भिंती स्वच्छ करून त्यावर चित्र तयार करून त्या बोलक्या केल्या जात आहेत.