माथेरान पालिका स्वतः वसूल करणार प्रवासी कर

पालिका प्रशासकाकडून पालिकेचे नुकसान
आर्थिक भ्रष्टाचाराचे नवीन कुरण

। नेरळ । वार्ताहर ।
माथेरान या पर्यटनस्थळी येणार्‍या पर्यटकांकडून स्वच्छताकर म्हणून माथेरान गिरीस्थान नगरपरिषद प्रवासी कर वसूल करीत असते. या प्रवासी कर ठेक्यावरून माथेरानमध्ये गेली वर्षभर राजकारण रंगले होते. त्याच प्रवासी कराचा ठेका ठेकेदाराकडून रद्द करून आता माथेरान गिरीस्थान नगरपरिषद स्वतः प्रवासी कराची वसूल करू लागली आहे. दरम्यान, पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान केल्यानंतर आता माथेरान प्रवासी कराच्या माध्यमातून प्रवासी कर वसूल करणार आहे. मात्र, त्यातून भ्रष्टाचाराचे नवीन कुरण पालिकेकडे निर्माण झाले आहे.

माथेरान या पर्यटन स्थळे पर्यटनासाठी येणारे पर्यटक यांच्याकडून पर्यटन स्थळावरील स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता कर संकलित केला जातो. त्यासाठी गिरीस्थान नगरपरिषद मध्ये मार्च 2020 मध्ये पालिकेने खारघर येथील ठेकेदार एसएस मल्टी सर्व्हिसेस यांना 12 कोटी 60 लाखांत दिला होता. मात्र, त्याच काळात देशात कोरोना आला आणि त्यामुळे शासनाने लावलेल्या लॉकडाऊनमुळे संबंधित ठेकेदाराने काम सुरू केले नाही. ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या पालिकेच्या सभेमध्ये ठेकेदाराला 5 नोव्हेंबर 2020 पासून ठेका सुरू करण्याचे आदेश दिले. कार्याध्यक्ष मानले नाहीत तर त्याचे 72 लाख रु अनामत रक्कम जप्त करण्याचा ठराव पारित करण्यात आला. अखेरीस ठेकेदाराने मार्च 2021 मध्ये काम सुरू केले.

दरम्यान, ठेक्याची रक्कम कमी करण्याचे पत्र पालिकेस दिले. पालिकेने पाच सदस्यांची कमिटी नेमली. यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवासी कराच्या उत्पन्नाच्या 70 टक्के पालिकेस व 30 टक्के ठेकेदारास असा फॉर्म्युला तयार केला. तो 30 एप्रिल 21 पर्यंत होता. 27 मेच्या सर्वसाधारण सभेत हाच फॉर्म्युला 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्याचे ठरले. ठेकेदाराचा मूळ ठेका 12 कोटी साठ लाखांचा कमी करून नऊ कोटी 50 लाख करण्यात आला आणि अनेक महिने माथेरान पर्यटकांसाठी बंद असल्याने प्रवासी कर संकलन करणार्‍या ठेकेदार यांना कर संकलनासाठी तीन महिने मुदतवाढ देण्याचा हा निर्णय पालिकेच्या सदस्य मंडळाने घेतला होता.

मात्र, माथेरान गिरिस्थान नगरपरिषदने पालिकेच्या 17 सदस्यांनी एकमताने मंजूर केलेला ठराव रायगड जिल्हाधिकारी यांनी मान्य केला होता. त्यात ठेकेदाराला तीन महिन्यांनी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि मात्र पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी पालिकेचा ठराव मान्य केला नाही आणि पालिकेवर प्रशासकीय राजवट येताच पालिकेचे आर्थिक स्टोस्त्र असलेल्या प्रवासी कराचे संकलन ठेका रद्द केला.

कोरोना काळात कोणत्याही प्रकारचे व्यवसाय नसताना माथेरानसारखी पर्यटनस्थळे तर राज्य सरकारने बंद केली होती आणि त्यामुळे पर्यटक या ठिकाणी येण्याची शक्यता नव्हती.त्यामुळे नैसर्गिक नियमाप्रमाणे प्रवासी कर संकलन करणार्‍या ठेकेदाराला पालिकेच्या लोकनियुक्त सदस्य मंडळाने तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता.मात्र माथेरान पालिकेत सप्टेंबर 2021 मध्ये मुख्याधिकारी म्हणून रुजू झालेल्या सुरेखा भणगे यांनी ठेकेदारावर पालिकेच्या सदस्य मंडळाने मेहेरनजर दाखवली असताना सदस्य मंडळाच्या निर्णयाविरुद्ध आपली भूमिका कायम ठेवली होती. त्यात एक जानेवारी रोजी माथेरान पालिकेचे सदस्य मंडळाची सत्ता संपुष्टात आली आणि प्रशासक बनलेल्या मुख्याधिकारी भणगे यांनी पद्धतीशीर पणे माथेरान पालिकेचा ठेका आपल्या कर्मचार्‍यांचा हाती घेतला. त्यात पालिकेने नियम दाखवून सदस्य मंडळाचा मुदतवाढ देण्याचा आणि जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिलेला ठराव रद्द करून मनमानीपणे पालिकेतील भ्रष्टाचाराचे आर्थिक कुरण समजल्या जाणार्‍या प्रवासी कर संकलन वर कब्जा मिळविला आहे.

प्रवासी कर संकलन ठेकेदार यांचा ठेका रद्द झाल्याने पालिकेने कर संकलन सुरू केले आहे. त्यासाठी पालिकेच्या कर्मचार्‍यांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

सुषमा भणगे-प्रशासक, माथेरान गिरीस्थान नगरपरिषद
Exit mobile version