पहिल्याच पावसात मधूर गायनाने माथेरानकर मंत्रमुग्घ

सी के आर्टिस्ट ग्रुपचे स्नेहसंमेलन उत्साहात
| नेरळ | प्रतिनिधी |

हौशी कलाकार यांनी एकत्र येऊन सीके आर्टिस्ट ग्रुप स्थापन केला असून त्यांचे पहिले स्नेहसंमेलन माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी साजरे झाले. या आर्टिस्ट ग्रुपच्या माध्यमातून राज्यातून अनेक भागातून आलेल्या गायक आणि वादक यांनी माथेरानमधील थंड हवेच्या ठिकाणी सर्वांना मंत्रमुग्ध केले.


ग्रुपने आपले पहिले स्नेहसंमेलन माथेरान मधील माथेरान मधील गर्द वनराईत असलेल्या गुलशन हॉटेलमध्ये आयोजित केले होते.संगीत प्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाच्या सुरमय गीतांच्या भरघोस आनंद घेतला या कार्यक्रमाचे नियोजन माथेरान चे गायक चंद्रकांत काळे यांनी केले होत. वर्षातून दोन वेळा अशा प्रकारचे गायन वादन स्नेहसंमेलन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात होईल अशी घोषणा करीत कार्यक्रमाच्या शेवटी स्वर्गीय गानसम्राज्ञी लता मंगेशकर स्वर्गीय मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार रमेश देव बप्पी लहरी एस पी बालसुब्रमण्यम तर तुर्ताच महान गायक के के यांचे निधन झाले अशा दिग्गज गायकांना श्रद्धांजली वाहत विवेक देवळेकर यांनी अनेक अजरामर गाणी सादर केली.त्यातून माथेरान मधील गुलशन हॉटेल आणि परिसरात सर्वागसुंदर गाण्यांना रसिकांची उत्स्फूत दाद मिळत होती.


माथेरानमधील पहिल्या पावसाच्या वातावरणात आवाजाने सुरेल हिंदी मराठी गितांच्या कार्यक्रमाने माथेरानचे वातावरण हॉटेल गुलशन या परिसरातील वातावरण जसे स्वरमय करून टाकले होते.भारतभरातून आलेल्या गायक कलावंत यामधील गायक विवेक दहिवलीकर, मेश्राम,योगिता सावंत,तुषार जाधव,ओम काळे,विनायक अंजरलेकर,चंद्रकांत काळे सहवादक कलावंत अनिकेत गंगावणे व त्यांचा वादक समूह यांनी आपापल्या अंगी असणार्‍या कलेची प्रस्तुती केली. या स्नेहसंमेलनात उत्कृष्ट गायन स्पर्धेचे आयोजन केले होते.त्यात माथेरान तसेच अन्य भागातील अनेक हौशी कलाकारांनी गाणी सादर केली. त्यात प्रथम द्वितीय व तृतीय असे गौरव पुरस्कार देण्यात आले या स्नेहसंमेलनाचे गायक मोहम्मद शकील नागपूर यांनी आपल्या सुमधूर गायनाने प्रथम क्रमांकाचा गौरव पुरस्कार पटकावला तर द्वितीय क्रमांक गौरव पुरस्कार स्नेहा साटम मुंबई यांना मिळाला तृतीय क्रमांकाचा गौरव पुरस्कार सौ संगीता चव्हाण आणि दिनेश नाटकर मुंबई यांना विभागून देण्यात आले तर सीके आर्टिस्ट ग्रुपमधील सर्व कलाकारां प्रमाणपत्र देण्यात आली.

Exit mobile version