संत ज्ञानेश्‍वर माऊली संजीवनी समाधी सोहळा उत्साहात

। पेण । वार्ताहर ।
महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने संत ज्ञानेश्‍वर माऊली संजीवनी समाधी सोहळा कार्यक्रम पार पडला. मंगेश पेडामकर व साक्षी पेडामकर हे उभयता संत ज्ञानेश्‍वर माऊली प्रतिमेची पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात केली.
सकाळच्या सत्रात 10 ते 12 कार्यक्रम व सायंकाळी 5 ते 8 यादरम्यान अभंग गायनाचे कार्यक्रम झाले. यामध्ये पेणेतील दिग्गज गायक, गायिका सहभाग घेतला. यामध्ये भजनसम्राट विलास मनोरे तसेच स्वरांजली पेणच्या विद्यार्थ्यांनी भजने सादर केली. तसेच सुचित्रा जोशी तथा माऊली यांना मानपत्र देऊन सन्मानित केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गांधी वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद वनगे, उपाध्यक्ष अशोक देसाई, कार्यवाह सुनील तथा आप्पा सत्वे, नंदा म्हात्रे आदींनी मेहनत घेतली.

Exit mobile version