। लखनऊ । वृत्तसंस्था ।
मायावती यांची पुन्हा एकदा बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. लखनऊ येथील पक्ष कार्यालयात मंगळवारी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सतीश मिश्रा यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. यानंतर मायावती यांची एकमताने बसपा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. मायावती 21 वर्षे (18 सप्टेंबर 2003) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय अध्यक्षांची निवड दर 5 वर्षांनी होते. मायावती यांचे पुतणे आकाश आनंद राष्ट्रीय समन्वयक म्हणून कायम राहणार आहेत. मात्र, त्यांचा दर्जा आणखी वाढला आहे. राष्ट्रीय समन्वयकासोबतच त्यांना 4 निवडणूक राज्यांचे (हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, महाराष्ट्र) प्रभारीही बनवण्यात आले आहे.