नगराध्यक्षांकडून खा. बारणे, मंत्री एकनाथ शिंदेंचे आभार

कर्जत | वार्ताहर |
कर्जत नगरपरिषद हद्दीतील विकास कामांना एमएमआरडीएच्या निधीतून 28 कोटी 33 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबद्दल नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी खासदार श्रीरंग बारणे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत.
कर्जत नगरपरिषद क वर्गाची नगरपरिषद असल्याने नगर परिषद क्षेत्रात विकासकामांना निधी कमी पडत असतो. या विकासकामांना एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी मिळावा यासाठी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची वेळोवेळी यांची भेट घेऊन कर्जत नगरपरिषदेचे क्षेत्रातील प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावास नगर विकास विभागाकडून कर्जत नगरपरिषद क्षेत्रात 28 कोटी 33 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

Exit mobile version