एम.बी.पाटील स्कूलचा 100% निकाल

। खांब । वार्ताहर ।

एम.बी.पाटील स्कूल वर्षे,ता. रोहा या स्कूलने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत याही वर्षाचा एस.एस.सी.परीक्षा मार्च 2024 बोर्ड परीक्षेचा निकाल 100% लावला आहे.

या स्कूलचा गेली अनेक वर्षं 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल हा चांगला लागत असल्याने पालकवर्गातून देखील समाधानाची भावना व्यक्त होताना दिसत आहे. तर चालू वर्षाच्या निकालात या स्कूलमध्ये प्राप्ती मनोज मोरे या विद्यार्थ्यीनीने 91.80 % गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे. तर द्वितीय क्र. नांदगावकर स्वरा नरेश 87.40%, तृतीय क्र. कांबळे ओम उत्तेश 86.80 %, चतुर्थ क्र. शेळके कुणाल चंद्रकात 86.00% तर पंचम क्र. भायदे समीर अचल व चौहान सपना संजय 85.60 % गुण प्राप्त केले आहेत. विद्यार्थी वर्गाच्या या सुयशाबद्दल चेअरम मधुकर पाटील, पी.जी.देशपांडे, मच्छिंद्र पाटील मुख्याध्यापिका पुनम देसाई यांनी तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version