24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| रायगड | प्रतिनिधी |

गर्भातील बाळामध्ये गंभीर व्यंग किंवा वैद्यकीय गुंतागुंत आढळल्यास गर्भवती महिलांना 24 आठवड्यांपलीकडे वैद्यकीय गर्भपाताची कायदेशीर परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग येथे वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

या मंडळात अध्यक्ष म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह स्त्रीरोगतज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, हृदयविकार तज्ज्ञ, श्वसनविकार तज्ज्ञ, अनुवंशतज्ज्ञ, मेंदूविकार तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ अशा एकूण नऊ तज्ज्ञांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांमध्ये सर्व बाजूंचा वैद्यकीय आढावा घेऊन आवश्यकतेनुसार निर्णय घेतला जाणार आहे.

रायगड जिल्ह्यातील अशा प्रकरणांमध्ये संबंधितांनी या वैद्यकीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version