हायवे मृत्यूंजयदुतांना उद्या वैद्यकीय प्रशिक्षण

पोलादपूर | शैलेश पालकर |

महाराष्ट्र राज्य अपर पोलीस महासंचालक वाहतुक मुंबई विभाग डॉ.भूषणकुमार उपाध्याय (भारतीय पोलीस सेवा)यांच्या मार्गदर्शनाखाली हायवे मृत्यूंजय दूत योजनेंतर्गत मृत्यूंजयदुत यांना कशेडी टॅप पोलीसांकडून प्रथमोपचाराबाबत प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक अनिल चांदणे यांनी येथे दिली. या प्रथमोपचार प्रशिक्षण शिबीराप्रसंगी मुंबई महामार्ग वाहतूक मुख्यालय, पोलीस अधिक्षक सुनीता साळुंखे-ठाकरे, महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र रायगड पोलीस उपअधिक्षक संदीप भागडीकर, महामार्ग रायगड विभागाच्या पोलीस निरिक्षक गौरी मोरे यांच्या उपस्थितीत दि रेसिलेन्ट फाऊंडेशन बोईसर-पालघरचे प्रशिक्षक भूपेंद्र मिश्रा हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती एएसआय बोडकर यांनी दिली.

Exit mobile version