| उरण | वार्ताहर |
रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि .बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई या विद्यालयात चालू शैक्षणिक वर्षाची विद्यालयाची स्कूल कमिटीची व सल्लागार समितीची सभा विद्यालयाचे चेअरमन अरुण शेठ जगे यांच्या अध्यक्षतेखाली व कामगार नेते सुरेश पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाली. सुरेश पाटील यांची अखिल भारतीय पोर्ट ऑथॉरिटीच्या वेतन सल्लागार सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सल्लागार समितीचे सदस्य डी. आर .ठाकूर यांना रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावी, बारावी कला व विज्ञान विभागात प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सल्लागार समितीचे सदस्य नरेश घरत, अवि पाटील, यशवंत घरत, अमृत ठाकूर, रघुनाथ ठाकूर, बाळासाहेब पाटील, मधुकर पाटील, प्रभाकर मुंबईकर, जे.सी.घरत, हिरामण पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नुरा शेख यांनी आभार मानले.