| खरोशी | वार्ताहर |
अखिल रायगड जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व कर्मचारी संघाची सभा अभिमन्यू गावंड उरण तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आगरी समाज विकास मंच पेण येथे संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून डॉ. मनिष वनगे, डॉ. शुभम ठाकूर, विलास शिंदे (क्षेत्रिय अधिकारी स्टेटबँक रायगड), श्लोक कुमार सिंह (मुख्य प्रबंधक स्टेटबँक पेण), डी.पी. म्हात्रे (निवृत्त जिल्हा) न्यायाधीश, शैलेश पाटील (उपाध्यक्ष कोकण विभाग कामगार आघाडी), पत्रकार धनाजी घरत, सुहास पाटील (समाजसेवक), गटशिक्षणाधिकारी अरूणादेवी मोरे आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते.
यावेळी मागील सभेचा अहवाल वाचन करून पेण तालुका अध्यक्ष रविकांत ठाकूर यांनी प्रास्ताविकातून वर्षभरापासून केलेल्या कामाची माहिती दिली. मान्यवरांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमरचंद पाटील (जिल्हाध्यक्ष), प.जा. म्हात्रे (जिल्हा कार्याध्यक्ष), रविकांत ठाकूर (पेण तालुका अध्यक्ष व राज्य प्रतिनिधी), अविनाश म्हात्रे (राज्य प्रतिनिधी रायगड) आदींनी मेहनत घेतली. सूत्रसंचलन गणेश थवई यांनी केले.