सेवानिवृत्त शिक्षकांची सभा

| खांब | वार्ताहर |

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ शाखा रोहाची द्वैमासिक सभा प्रा.शिक्षक पतपेढी रोहा येथे नुकतीच घेण्यात आली. यासभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. तसेच 1 फेब्रुवारीच्या मेळाव्यात सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले. सभेस येलकर गुरूजी, करंजे गुरूजी, ठमके गुरुजी, सोष्टे गुरूजी, खरिवले गुरूजी, चोपडे गुरूजी, सोनार गुरूजी, मोरै गुरूजी उपस्थित होते. सहदेव कापसे यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपन्न करण्यात आली.

Exit mobile version