। अलिबाग । प्रतिनिधी ।
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि.2) दुपारी 2.30 वाजता अलिबाग येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या जनरल अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागची त्रैमासिक संपर्क सभा आयोजित करण्यात आली आहे.
या त्रैमासिक सभेत सभेचे नेहमीप्रमाणे विषय होणार असून शिवाय ज्यांच्या लग्नाला चालू वर्षी 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत, अशा जोडप्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. अशा जोडप्यांची माहिती शुक्रवार, 23 सप्टेंबरपर्यंत संबंधित सभासदांनी संस्थेच्या कार्यालयात समक्ष आणून द्यावी व सदर सभेस संस्थेच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ल.नी. नातू यांनी केले आहे.