। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील नांदगावच्या शिवशाही प्रतिष्ठान आयोजित साखरचौथ गणेश उत्सव मित्र मंडळातर्फे बाजारपेठेतील साखरचौथ गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. यंदाच्या पुजेचा मान नेहा नरेश कुबल कुटुंबियांना मिळाला.
यानिमित्ताने संगीत भजन, महिलांचे हळदीकुंकू, महाआरती घेण्यात आली. यावेळी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुधवारी पूजाअर्चा आरती व सायंकाळी मुर्तीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून विसर्जन सोहळा संपन्न झाला. यावेळी सुदेश घुमकर, दिनेश रावजी, योगेश जायसवाल, सुदेश भणगे , राजू पोतदार, उत्तम शेळके, महेश कोतवाल, दिनेश शाहपूरकर,राजू देऊळकर, ओमकार साखरकर, सिद्धेश किर, जितेंद्र दिवेकर, उदय थळे, अनंता कुमरोटकर,विशाल पाटील, महेश मापगांवकर, मंगेश देऊळकर,मिलिंद माळी, चंद्रकांत देऊळकर, निखिल पुलेकर,संदीप थळे, प्रभाकर निरकर,राज पवार, मुर्तीकार सतिश जोशी, जयेश देऊळकर,दिपक पवार, जितेंद्र सुर्वे, अशोक पाटील, सुरेंद्र देऊळकर,तेजस रावजी, प्रभाकर गाणार, गजानन शाहपूरकर ,कुणाल गाणार, कल्पेश मळेकर आदी. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.