रोहा रेल्वे प्रवाशांच्या समस्या लवकर सुटणार
। रोहा । वार्ताहर ।
रोहा रेल्वे प्रवाशांच्या समस्या लवकर सुटणार असून मध्य रेल्वेने मेमुच्या फेर्या वाढविण्याबरोबरच एक्स्प्रेससाठी रोहा थांबा देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मध्य रेल्वेच्या पनवेल ते रोहा विभागात प्रवशांना होत असलेल्या त्रासाबद्दल रोहा रेल्वे प्रवासी महासंघ समितीने मागील काही महिन्यांपासून रोहा मेमु फेर्या वाढविण्यासाठी आणि जलद मेल एक्सप्रेस गाड्यांना पुन्हा रोहा येथे थांबा देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यावेळी रेल्वे अधिकार्यांनी याबाबत सकारत्मक उत्तर दिलं होतं.
तसेच रोह्यापासून पुढे विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर जलद गाड्या रोह्यात थांबतील असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने दि.15 पासून कोकण रेल्वेच्या काही गाड्या विजेवर धावणार आहेत. त्यामुळे या गाड्या लवकर रोह्यात थांबतील, अशी आशा समितीला आहे. समितीने सर्व प्रवशांना आपले पास हे फक्त रोहा, नागोठणे आणि कासू स्टेशन येथूनच काढावे, असे आवाहन केले आहे .