तळा तालुका पेन्शनर संघटनेची सभा

। तळा । वार्ताहर ।
तळातालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेची सर्व साधारण सभा ज्येष्ठ सभासद मारूती शिर्के गुरुजीयांच्या निवासस्थानी संपन्न झाली. या सभेला बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.
गेल्या वर्षभर कोरोना महामारीचे संकट असल्याने शासनाच्या आदेशाचे पालन करून सभा घेण्यात आली नव्हती. दरम्यान ही सभा राज्यसंघटनेच्या परवानगीने भरविण्यात आली. यावेळी दिवंगत सदस्य व नातेवाईक, माजी सैनिक यांना श्रद्धांंजली वाहण्यात आली. वर्षभरापासून संघटनेच्या प्रलंबित समस्यांची माहिती, उपाययोजना कार्यवाहीचा आढावा त्याचबरोबर राज्य सरकारच्या महागाई भत्ता, पेन्शनची नियमावली अध्यक्ष भानू स. मंचेकर गुरूजी यांनी विषद केली. तसेच जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार मनोज सुतार यांचा विशेष सन्मान करून गौरविण्यात आले.

ज्येष्ठ सदस्य मारूती शिर्के यांचा वाढदिवस सपत्नीक, श्रीफळ गुलाब पुष्प देऊन साजरा करण्यात आला. प्रस्तावना व स्वागत मागील सभा इतिवृत्त सचिव जनार्दन वडके यांनी केले. आभार प्रदर्शन अनंत वारे यांनी केले.

Exit mobile version