तळा तालुक्यातील विकासकामांबाबत बैठक

| माणगाव | प्रतिनिधी |
तळा तालुका शिवसेना-युवासेना शिंदे गटाची आढावा बैठक युवासेना द. रायगड जिल्हाप्रमुख, श्री. विपुल उभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शाखा संपर्क कार्यालय, तळा येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी आम.भरत गोगावले यांच्या माध्यमातून विकासकामे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

गोगावले यांनी तळा तालुक्यातील प्रस्तावित विकासकामांसाठी रु. 2 कोटी निधी ची घोषणा केली असून लवकरच प्रशासकीय मान्यता मिळून कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सदर बैठकीत विपुल उभारे यांनी दिली. यावेळी प्रद्युम्न ठसाल,राकेश वडके, नमित पांढरकामे, नरेश सुर्वे ,दिपेश गोळे, रघुनाथ वाघरे, दीपक चिंचालकर,रमेश तांदलेकर,संजय रेडीज,विठोबा चांडीवकर,शशी ठमके,चंद्रकांत सुतार,गणेश तळकर, संदीप दळवी आदी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version