जगाची क्रीडाराजधानी बनू पाहतेय मेलबर्न!

मेलबर्नला गार्डन सिटी म्हटलं जायचं त्यानंतर मेलबर्नचं ‘सिटी ऑफ इव्हेन्टस् झालं. आज मात्र मेलर्बनचे ओळख ‘कॅपिटल ऑफ वर्ल्ड स्पोर्टस अशी आहे. कारण अर्थातच स्पष्ट आहे. स्थानिक प्रशासन, कौंसिल, व्हिक्टोरिया सरकार आणि जनता क्रीडा प्रेमी आहे. सर्व प्रमुख खेळ एकवटलेली जगातील ही एकमेव जागा आहे.

मेलबर्न क्रिकटे ग्राऊंडची प्रेक्षकक्षमता एक लाखावर गेली आहे. क्रिकेटमधील सर्वाधिक प्रेक्षकक्षमतेचे हे एकमेव ग्राऊंड आहे. आणि एकदा का या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर, स्टेडियमच्या दोन्ही बाजूला असणाार्‍या रेल्वे स्टेशनमधून ड्राम स्टेशन्सवरून किंवा बस स्टॅन्डवरून आत शिरलं की खेळाच्या विश्‍वायाची दुनियेत आपण शिरतो. जेथे जगातील सर्वोत्तम क्रिकटेपटू खेळतात, खेळले आहेत. क्रिकेटच्या इतिहासाची अने पाने सुवर्णाक्षरांनी लिहीली गेली आहेत. उच्चांक नोंदविले गेले आहेत. सर डॉन बॅडमन यांच्या बॅटीतून निघालेल्या चौफेर फटक्यांनी एकेकाळी हेच मेलबर्न क्रिकेटग्राउंड शहारून जायचं. याच मैदानाने शेन वॉर्नच्या लेग रचीन गुगलीचे अशक्य कोटीतील वाटणारे प्रताप पाहिजे आहेत. काळ्यावाच याच मैदानाने टवेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाचा फैसला होताना पाहिला कसोटी क्रिकेटचा पहिला (1877) कसोटी सामना पाहिला. 1971 पहिला एकदिवसीय सामना पाहिजे. हेच मेलबर्न ग्राउंड ऑस्ट्रेलियन फुटबॉल व रग्वी या खेळाच्या थराराचा अनुभव प्रेक्षकांना देते. जेव्हा क्रिकेट नसते तेव्हा ऑस्ट्रेलियाने निश्‍चित केलेल्या नियमांच्या आधारे चालणारा फुलबॉल खेळ पहायला ही लाखो प्रेक्षक जमतात. या ऑस्ट्रेलियन फुटबॉलचे नियत जसे वेगळे, स्वतंत्र आहेत तसेच त्याचे गोलपोस्टही ऑस्ट्रेलियन फुटबॉल लिगच्या गोलपोस्टला दोन उंच खांब असतात आणि बाजूला दुतर्फा दोन छोटे खांब उंच खांबामध्ये चेंडू मारल्यास गोल होतो. छोट्या खांबामधुन चेंडू पास झाला तर गुण मिळतात. नियमांच्या कमी गोतावळा असलेला हा खेळ ऑस्ट्रेलियन लोकांमध्ये आज क्रिकटेपेक्षाही लोकप्रिय आहे.

याचा अनुभव मला स्वतःलाच आला. ऑस्ट्रेलियाच्या विक्रचषक सामन्याला फारशी गर्दी नव्हती. भारताच्या झिम्बाबे विरूद्ध सामन्यासाठी 90 हजार प्रेक्षक आले होते. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकटे संघ उपांत्य फेरीत देखील न पोहोचल्याचे दुःख कुणालाच जाणवले नव्हते. कारण ऑस्ट्रेलियाचे क्रीडाप्रेमी जनता विविध खेळांमध्ये विखुरली गेली आहे. त्यामुळेच मेलबर्न क्रिकटे मैदानाची हिरवळ चालता चालता तुम्ही आजूबाजूला नजर टाकली की फुटबॉल ऑथलेटिक्स, टेनिस जलतरण बास्कटेबॉल, सुपर नेटबॉल, जिम्मॉस्टिक्स, आईल हॉकी आदी खेळांची जागतिक दर्जाची स्टेडियम नजरेला पडतील. हे सारं व्हिक्टोरिया सरकारने मेलबन्र पार्कमध्ये वसविली आहेत.

1853 साली मेलबर्न क्रिकेट स्टेडियम सर्वप्रथम बांधले गेले. मात्र अन्य सुविधांच्या निर्मितीसाठी क्रिकेटच्या संसांर आजूबाजूच्या मैदानावर होत राहिला. अखेर आज जेथे मेलबर्न क्रिकेट स्टेडियम आहे ती जागा व्हिक्टोरिया सरकारने क्रिकेटला दिली. आणि जगातील एक अप्रतिम क्रिकेट स्टेडियम उभे राहिले. मात्र क्रिकेटचा खेळाचा आत राखून जेथे व्हिएफ एल लिग, ऑस्ट्रोलियन फुटबॉल लिगचे अंतिम सामने व्हायला लागले. ख्रितीयानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, नेमार आदि विक्रविख्यात फुटबॉलपटूंच्या खेळाचा पदन्यास याच मैदानाने पाहिला. 1956 च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन पाहिले. 2006च्या राष्ट्रकुल स्पर्धा पाहिल्या ऑस्ट्रेलियाच्या विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेची पात्रता फेरी पाहिली. त्याशिवाय म्युझिक व करमणूकीचे अन्य प्रकारही पाहिले पोप जॉन पॉल दुसरे यांची वाणीही ऐकली.

एक लक्षापेक्षाही अधिक प्रेक्षकक्षमतेचे हे स्टेडियम, मैदान म्हणूनच प्रत्येक ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या हदयात मानाचे स्थान पटकावून आहे. यारा नदीच्या काठावरच वसविण्यात आलेल्या या एमसीजी’ला ऑस्टेलियन नागरीक ‘जी’ एका इंग्रजी अद्याक्षराने संबोधातात. या स्टेडियमच्या सर डान ब्रॅडमन यांच्या पुतळ्याजवळ उभे राहिले की समोरच फुटबॉल स्टेडियम दिसते. तेथे जाण्यासाठी एक पूल आहे. हा पूलच क्रिकेट आणि अन्य क्रीडा प्रकारांना जोडणारा एक सांधा आहे. डाव्या हाताला टेनिस प्रॉक्टिस व्हिलज आहे. उजव्या हाताला चार ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धांपैकी एक मानली जाणारी ऑस्टे्रलियन ओपन टेनिस होते. प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात टेनिसच्या चार धाम यात्रेतील वर्षाच्या पहिल्या मात्रेला जगातील सर्व सर्वोत्तम टेनिसपटू हजेरी लावतात. ऑस्ट्रेलियाचा महान टेनिसपटू रॉड लॅव्हर याच्या नावाने उभारण्यात आलेल्या या संकुलामध्ये 14 टेनिस कोर्ट आहेत. सेंटर कोर्टवर सरकते अच्छादन (छप्पर) आहे. जोडूनच मोबाईट कोर्ट या ऑस्ट्रेलियाच्या महिला टेनिसपटूच्या नावाने उभारलेले टेनिस स्टेडियम आहे. मधला रस्ता ओलांडला की समोरच ऑस्टे्रलियन फुटबॉल मैदान आहे. खेळूनच ऑलिम्पिक पार्क आहे. हायसेंस स्टेडियममध्ये बास्केटबॉल, नेटबॉल आदी खेळ होतात. हंगामात तर बुलफायटिंग स्पर्धाही होतात. सायकलिंगालाही ‘हायसेंस’ ने सहारा दिला असे फक्त फुटबॉल आणि रग्बीसाठी पूर्णपणे वाहिलेले स्टेडियम म्हणजे ‘एमी’ पार्क स्टेडियम फुग्याच्या किंवा फुटबॉल चेंडूच्या आकाराचे छप्पर असलेले हे स्टेडियम लोकांचे प्रमुख आकर्षण आहे.

एकाच पार्कमध्ये एवढे खेळ सामावाणारे मेलबर्न हे जगातील एकमेव शहद असावे. विशेष म्हणजे हे सर्व खेळ त्यांचे मुख्य स्टेडियम किंवा सरखाच्या जागा दाटीवाटीने वसविलेल्या नाहीत. प्रशस्त पार्कमधून मनसोक्त फिरत फिरत या सर्व स्टेडियमवर जाता येते आणि कडेने वाहत जाणार्‍या यारा नदीच्या पात्रातील नौकानयन स्पर्धा पहात पहात तुम्हाला ‘फ्लींडर्स स्ट्रीट या मध्यवर्ती ठिकाणी जाता येते. ऑस्ट्रेलियाच्या स्वतंत्रता दिवसाच्या आखणी जागविण्यासाठी करण्यात आलेल्या फेडरेशन स्न्वेअर येथे जाता येते. मनोरंजन आणि विरंगुळा यासाठी हा भाग म्हणूनच लोकप्रिय झाला आहे.

पर्यटकांची मेलबर्न पार्कमधील स्पोर्टस अ‍ॅरेनामध्ये कायम गर्दी असतेच. परंतु प्रत्येक आठवड्याच्या अखेरीज शानिवारी आणि रविवारी ऑस्ट्रेलियन नागरिक या क्रीडा उद्यानात हजारोंच्या संख्येत विखुरलेले पहायला मिळतात. त्यात खेळाडू असतात. क्रीडारसिक असतात. सर्वसामान्य कुटूंब देखील असतात. जगातील क्रीडाराजधानी बनू पाहणार्‍या या मेलबर्न शहरात.

Exit mobile version