सभासदांना पंधरा टक्के लाभांश मिळणार

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद कर्मचारी सहकरी पतपेढी अलिबाग या संस्थेची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अलिबागमधील कित्ते भंडारी भवन येथील स्व. गोविंद बाबू नार्वेकर सभागृहात शनिवारी (दि.29) घेण्यात आली. ही सभा संस्थेचे चेअरमन राजेंद्र गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये चालू वर्षात निव्वळ झालेल्या नफ्याचा विचार करता संस्थेतील सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला.

यावेळी संस्थेचे चेअरमन राजेंद्र गायकवाड, व्हाईस चेअरमन वैभव पाटील, ऑडीटर सेक्रेटरी सुदिन कांबळे, संचालक सुनील घुटे, महेंद्र पुगांवकर, निलेश कार्लेकर, दिपक देवरुखकर, स्नेहल मोरे, अमोल खैरनार, अमरदिप ठोंबरे, सुनील भुरे, राजेंद्र म्हात्रे, स्मिता पाटील, तज्ञ संचालक देवेंद्र झेंडेकर, सचिन कुरकुंडे आदी पदाधिकारी, संचालक, सभासद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे, नफा- तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक वाचून मंजूर करणे, नफा वाटणीस मंजूरी देणे, 2026-27 च्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, वैधानिक लेखा परिक्षक यांचे अहवाल वाचणे, लेखा परिक्षक व टॅक्स ऑडीटरची नेमणूक करणे, हिशेब तपासणीस यांची नेमणूक करणे, तसेच त्यांचा मेहनताना ठरविणे अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये सर्वांनुमते ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान, या बैठकीत सभासद फी वाढीबरोबरच ठेवीवरील व्याज, कर्जावर विमा काढणे अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. या सभेच्या निमित्ताने जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतपेढीच्या सभासदांच्या दहावी व बारावीमध्ये उतीर्ण झालेले तसेच अन्य क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

Exit mobile version