सासवणे येथे स्व. विकास बाबूशेठ शिलदणकर स्मृती चषक कुस्ती स्पर्धा उत्साहात

आटपाडीचा मल्ल तानाजी वीरकर विजेता
| अलिबाग | प्रतिनिधी |

सासवणे येथे माता फुलाई देवीच्या प्रांगणात स्व. विकास बाबुशेठ शिलदणकर स्मृती चषक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आटपाडीच्या तानाजी वीरकरने आव्हानाची कुस्ती जिंकत मानाची गदा पटकाविली. स्पर्धेतील अंतिम लढत वासिम पठाण कवठेपिराण, सांगली विरुद्ध तानाजी विरकर आटपाडी या दोन मातब्बर मल्लांमध्ये झाली.दोघांनीही नेत्रदिपक खेळाचे प्रदर्शन केले. शेवटी तानाजी वीरकर या मल्लाने बाजी मारून तो अंतिम कुस्तीतील विजेता ठरला. स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली, आटपाडी, ठाणे, कल्याण, मुंबई, रायगड व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी सहभाग घेतला. कुमार प्राण जयेंद्र भगत वाडगाव या लहान वयाच्या मल्लाने तीन विजयी कुस्त्या मारुन प्रेक्षकांची मने जिंकली.


स्पर्धेतील विजेते संघ
*प्रथम क्रमांक- छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा,आंदोशी
*द्वितीय क्रमांक- जय हनुमान तालिम संघ,वाडगाव
*तृतीय क्रमांक – टाकादेवी स्पोर्ट्स क्लब मांडवा


विकासशेठ बहुआयामी व्यक्तिमत्व
स्व. विकास बाबूशेठ शिलदणकर म्हणजे माणसातील माणुसकीची नाती जपणारं बहुआयामी व्यक्तिमत्व. एक प्रेमळ व मनमिळाऊ व्यक्तिमत्व. स्व.बाबुशेठ म्हणजे सामाजिक बांधिलकी असलेला, गोरगरिबांना अडी-अडचणीत मदत करणारा, दिलदार मनाचा, लोकांच्या हृदय सिंहासनावर प्रेमाचे अधिराज्य गाजवणारा प्रेमळ व दमदार माणूस अशी त्यांची सर्वत्र ओळख होती. स्व.बाबूशेठ म्हणजे एक धुरंदर व दिलखुलास व्यक्तिमत्व, प्रत्येकाला हव हवस वाटणारं व्यक्तिमत्व. स्व. विकास शिलदणकर पंचक्रोशीत होणार्‍या कुस्ती, कबड्डी, क्रिकेट स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सढळ हस्ते फार मोठी आर्थिक मदत करत होते. सासवणे येथे अनेकवेळा त्यांनी स्वखर्चाने भव्य दिव्य अशा कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्व. विकासशेठ यांच्या पत्नी सासवणे ग्रामपंचायत सदस्या नयना शिलदणकर, स्व.विकासशेठ यांचे सहकारी व मित्र परिवार तसेच शिलदणकर परिवार यांनी खूप मोठी मेहनत घेतली.

स्पर्धेला प्रत्येक क्षेत्राला सर्वोत्तम न्याय देणार्‍या अष्टपैलू राजकारणी, सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी झाला पाहिजे हा विचार कृतीत उतरवणार्‍या शेकाप महिला आघाडी प्रमुखा चित्रलेखा पाटील आवर्जून उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतातून स्व. विकासशेठ शिलदणकर यांच्या समाजकार्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला. माजी जि. प.सदस्य रविंद्र ठाकूर यांनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले.

या स्पर्धेला शेकाप ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, माजी समाज कल्याण सभापती दिलीपशेठ भोईर, सासवणे सरपंच संतोष गावंड, माजी जि.प. सदस्या रविना ठाकूर, जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, सेवा दल अध्यक्ष उमेश ठाकूर, आवास सरपंच अभिजीत राणे, सासवणे माजी उपसरपंच राजेंद्र शिलदणकर,माजी सदस्य एकनाथ नाखवा, अशोक म्हात्रे, किहीम माजी उपसरपंच प्रशांत दळवी, धोकवडे ग्रा.पं. माजी सदस्य अशोक घरत, सासवणे ग्रा.पं. सदस्या संजना पाटील, अश्‍विनी भगत, अस्मिता पाटील, विश्‍वास थळे, धोकवडे ग्रा.पं. सदस्या .वैजयंती धोंडसेकर, सदस्य अंकुर घरत, तुकाराम तोडणकर, माजी सदस्य अमर धोंडसेकर, शिवप्रसाद तोडणकर, सासवणे मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमन दयानंद कोळी, आ.सा.धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष जयंत चेऊलकर, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक संदेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते तोडणकर गुरुजी, राजू नाखवा, विराज भगत, गजानन पाटील, अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष जयेंद्र भगत, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सदस्य व अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस व बा.ना.हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद भगत ,अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस विलास पाटील, अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे सहकार्यवाह रविंद्र घासे, सदस्य जयेंद्र म्हात्रे, उपमहाराष्ट्र केसरी आसाबा अहमद आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रकाश भगत, बाळनाथ माने, सुधाकर पाटील, मिलिंद भगत, जितेंद्र माने यांनी काम पाहिले. गुणलेखक म्हणून प्रशांत ठाकूर, दयानंद म्हात्रे, ज्ञानेश्‍वर नाखवा, यांनी काम पाहिल, समालोचन रामदास गायकवाड सांगली यांनी तर सूत्रसंचलन धनंजय भगत यांनी केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांचा, पंचांचा समालोचकांचा तसेच आरोग्य सेविकांचा व कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा यथोचित सत्कार करण्यात आला. सर्व यशस्वी संघांना व विजेत्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.

Exit mobile version